वेंगुर्ले : १ लाख ७१ हजार रुपये किमतीची गोवा बनावटी दारू जप्त : दोघांवर गुन्हे दाखल

शेअर करा

वेतोरे येथे वेंगुर्ले पोलिसांची धडक कारवाई

वेंगुर्ले,दि. २१ जून
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे देवळवाडी येथे गोवा बनावटी दारू विक्रीवर वेंगुर्ले पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शनिवारी २० जून रोजी रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत १ लाख ७१ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत पोलिस कॉन्स्टेबल जयेष सरमळकर यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली आहे. बेकायदेशीर दारू विक्री करता जवळ बाळगल्या प्रकरणी वेतोरे देवळवाडी येथील शिवानी शंकर सातार्डेकर (४४) व शंकर काशीराम सातार्डेकर (४८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलिस हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोझा, जयेष सरमळकर, मनोज परुळेकर, गजानन देसाई, महिला होमगार्ड डिसोजा हे सहभागी होते.

शेअर करा