वेंगुर्ला : तुळस येथे भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन

शेअर करा

हिंदू समाजात एकात्मता, संघटन व धर्मजागृतीसाठी २१ जून रोजी उत्सव मंगल कार्यालयात विविध गावांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन


वेंगुर्ला, दि. १९ जून (प्रथमेश गुरव) –

हिंदू समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवार दि.२१ जून रोजी सायंकाळी ३.३० ते ६ या वेळेत तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडे व वजराट या गावांतील हिंदू बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने हे संमेलन पार पडणार आहे.
या संमेलनासाठी ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर गणेश गोविंद उर्फ राजू जोशी गुरूजी हे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृतीचे महत्त्व आणि संघटित समाजाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच हिंदू जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक हे हिंदू समाजासमोरील विविध आव्हाने, धर्मजागृती आणि संघटनात्मक कार्य यावर आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय अमित गोपाळ नाईक हे देखील उपस्थितांना संबोधित करून मार्गदर्शन करणार आहेत. तरी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या संमेलनास पारंपरिक मंगल वेशात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेअर करा