वेंगुर्ला : मानसिक आरोग्य व व्यसनमुक्त कार्यशाळा संपन्न

शेअर करा


वेंगुर्ला,दि.२३ जून

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित जीवनशैली राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. छंदांना वेळ देणे, कामाव्यतिरिक्त स्वत:च्या आवडीच्या गोष्टी केल्यास तणाव दूर होतो, असे प्रतिपादन डॉ.चंद्रशेखर हालिंगळे यांनी केले.


वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन आणि निर्मल हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने साई डिलक्स सभागृह येथे मानसिक आरोग्य व व्यसनमुक्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी व्यासपिठावर वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजे·ार उबाळे, सचिव डॉ.संजिव लिंगवत, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबच्या अध्यक्षा सुरेखा काळे, डॉ. वामन कशाळीकर आणि डॉ.ज्ञाने·ार शिवशरण आदी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ.हालिंगळे यांनी मोबाईल आणि सोशल मिडियाचा अतिवापर टाळल्याने मेंदूला आराम मिळतो. सत्काराम विचार व प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची वृत्ती ठेवल्यास मानसिक तणाव कमी होत असल्याचे स्पष्ट केले.


या कार्यक्रमाला डॉ.के.जी.केळकर, डॉ.सुदिश सावंत, डॉ.भिवा नाईक, डॉ.डि.टी.गोसावी, डॉ.मिलिंद काळे, डॉ.श्याम रेडकर, डॉ.दत्ता पवार, डॉ.आर.एम.परब, डॉ.वंदन वेंगुर्लेकर, अॅड.मनिष सातार्डेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.श्रीराम हिर्लेकर, डॉ.सई लिंगवत, डॉ.दिपाली पालयेकर, डॉ.क्लारा होडावडेकर, डॉ.सिल्विया आल्मेडा, डॉ.रूपाली पवार, डॉ. राखी माधव, डॉ.दिपाली देसाई, डॉ.स्नेहा नवार, डॉ.सोनाली सावंत, डॉ.जुई पेडणेकर, डॉ.अबिदा परब, डॉ.किशोर धोंड, डॉ.अमेय खानोलकर, डॉ. रावजी सातोसकर, डॉ.सोनाली खानोलकर, डॉ.मानसी सातार्डेकर, डॉ. अश्विनी सामंत, श्रीया सावंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. राजेश्वर उबाळे यांनी केले तर आभार डॉ. संजीव लिंगवत यांनी मानले.
फोटोओळी – वेंगुर्ला येथे झालेल्या मानसिक आरोग्य कार्यशाळेला बहुसंख्य डॉक्टर उपस्थित होते.

शेअर करा