Vengurla : वेंगुर्ल्यात २९ ऑक्टोबरपासून सात दिवसीय मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन!

शेअर करा

वेंगुर्ला नगरपरिषद व डॉ. वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमीचा संयुक्त उपक्रम; दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लोकमान्य टिळक सभागृहात शिबिर!

वेंगुर्ला,दि.२३ ऑक्टोंबर

नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद आणि डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सात दिवसीस मोफत मधुमेह योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट परिसरातील “आपला दवाखाना” शेजारी असलेल्या लोकमान्य टिळक सभागृहात घेण्यात येणार आहे.
शिबिरात योग थेरपी तज्ज्ञ डॉ. वसुधा मोरे व इतर तज्ज्ञ डॉक्टर सहभागी नागरिकांना रक्तातील साखरेचे नियंत्रण, संतुलित आहार, योगासने व व्यायाम पद्धती, ध्यान व प्राणायाम, वजन नियंत्रण, औषधांचे योग्य सेवन, तणाव व्यवस्थापन आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय डोळे, मूत्रपिंड, नसा आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतही सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ज्या नागरिकांना जमिनीवर बसून योगा करणे शक्य नसेल अशांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या ज्या नागरिकांना मधूमेह आजार आहे अशांनी जरूर या योेग शिबिरात सहभाग व्हावे. परंतु, ज्यांना हा आजार नाही अशा नागरिकांनी सुद्धा भविष्यात हा आजार होऊ नये यासाठी या शिबिरात सहभागी व्हावे.
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी शिबिरापूर्वी फास्टिंग इन्सुलिन, फास्टिंग व पोस्टप्रँडियल ब्लड शुगर तसेच या सर्व महत्त्वाच्या रक्त तपासण्या “आपला दवाखाना” येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संस्था, रोटरी क्लब , इनरव्हील क्लब आणि लायनेस क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन, नियमित योगाभ्यास आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद आणि डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमीच्यावतीने केले आहे. या शिबिरात मर्यादित प्रवेश असल्याने सहभागी होणाऱ्या नागरिकांनी 7774876395 किंवा 9130048102 यावर आपली नाव नोंदणी करावी.

शेअर करा