ह.भ.प. गो. आ. चांदेरकर महाराजांनी जपलेली वारकरी परंपरा यंदाही सुरू राहणार; सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमातून वारीला सुरुवात!
वेंगुर्ला,दि.२८ ऑक्टोंबर
श्री सदगुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादाने व कृपेने ह.भ.प.गो. आ. चांदेरकर महाराजांनी अनेक वर्षे सामुदायिक कार्तिकी पायी वाऱ्या काढल्या. ह.भ.प.चांदेरकर महाराजांनी वारकऱ्यांना या पायी वारीची अविट गोडी लावल्याने वारकरी या वारीची वाट पहात असतात. यंदाची ५१वी वेंगुर्ला ते पंढरपूर वारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी वेंगुर्ला येथील सद्गुरू नारायण महाराज श्री गोंदेकर गुरुकुल आश्रमातून निघणार आहे.
१० नोव्हेंबर रोजी दुपारी बिपीन वरसकर, रात्री मठ येथील सुरेश नाईक यांचे घर, ११ रोजी सकाळी स्व. चंदूशेठ आसोलकर यांची बाग, दुपारी संतोष पेडणेकर आडेली यांच्या घरी, रात्री बबन नाईक कोलगांव यांच्या घरी, १२ रोजी कोलगांव, दुपारी साटम महाराज मठ दाणोली, रात्री आंबोली, १३ रोजी सकाळी आंबोली, दुपारी आजरा, रात्री निपाणी, १४ रोजी सकाळी निपाणी, दुपारी नरसिंहवाडी, रात्री मिरज, १५ रोजी सकाळी मिरज, दुपारी नागज, रात्री पंढरपूर, १६ ते २२ नोव्हेंबर पंढरपूर मुक्काम, २३ रोजी वारकरी आपआपल्या घरी पोहोचतील. अधिक माहितीसाठी ९४२१२३५१५३ येथे किंवा श्री सदगुरु चांदेरकर महाराज शिष्यगण कमिटी, ह.भ.प. सावळाराम कुर्ले, श्री सद्गुरू नारायण महाराज, श्रीगोंदेकर गुरुकुल आश्रम, गांधी चौक, वेंगुर्ला या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.