वेंगुर्ला,दि.२३ जून,प्रथमेश गुरव)
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस बुधवारी शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यानिमित्त वेंगुर्ला भाजपाच्यावतीने येथील वेंगुर्ला शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शिक्षिका प्रगती आव्हाड यांच्यासह पालक सेजल रजपूत, चेतना रजपूत, देवेंद्र वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शाळेतर्फे भाजप पक्षाचे आभार मानण्यात आले.