Vengurla : वेंगुर्ल्यात रवळनाथ मंदिरात शिवलग्न सोहळा उत्साहात संपन्न!

शेअर करा

दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत शिवलग्न सोहळा; त्यानंतर तरंगदेवतांचे रामेश्वर मंदिरात आगमन, विधिवत पूजा व कौल कार्यक्रम पार पडला

वेंगुर्ला,दि.२१ ऑक्टोंबर

प्रतिवर्षाप्रमाणे वेंगुर्ला येथील रवळनाथ मंदिर परिसरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी शिवलग्न सोहळा बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या लग्नानंतर तरंगदेवता रामेेश्वर मंदिर येथे पाहुणचारासाठी आल्या. याठिकाणी त्यांची विधीवत पूजा झाल्यावर अवसारी स्वरुपात उपस्थित भाविकांना कौल देण्यात आला आणि त्यानंतर तरंगदेवता सातेरी मंदिरात विसावल्या. मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी या तरंगदेवतेचे दर्शन घेत श्रीफळ ठेवले.

शेअर करा