वेंगुर्ला : केळूस येथे 1 जुलै रोजी तालुकास्तरीय कृषिदिन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.२३ जून

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त बुधवार दि. 1 जुलै रोजी केळुस येथील स.का.पाटील विद्यामंदिरातील गुरूवर्य गोविंद मधुसूदन दाभोलकर सभागृहात वेंगुर्ला तालुकास्तरीय कृषिदिन कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यादिवशी केळूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात फळझाड व वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात प्रगतशील शेतक-यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. यावेळी शेतक-यांनी मोठ¬ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी केले आहे.

शेअर करा