वेंगुर्ला, दि. १९ जून (प्रथमेश गुरव)*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत मातोंड येथे वृक्षारोपण करत धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
याप्रसंगी मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, राजू परब, ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, राहूल प्रभू, किशोरी परब, सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परूळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबूराव खवणेकर यांच्यासह हिंदूत्ववादी कार्यकर्ते किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदिप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब, अविनाश परब आदी उपस्थित होते.
फोटोओळी – प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.