Vengurla : वेंगुर्ल्यात ११ रोजी उत्तरचंद्राची कोजागरी

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०६ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)-

मुक्तांगण महिला मंच, ज्येष्ठ नागरिक संघ आणि सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील बॅ.नाथ पै समुदाय केंद्रात ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता “उत्तरचंद्राची कोजागरी’ हा अभिवाचन अनुभव कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून या कार्यक्रमात वैशाली पंडित (आजी), संजय शिंदे (आजोबा), अक्षय सातार्डेकर (सुत्रधार), तन्वी पाटकर (सहकलाकार), वैभव मांजरेकर (तालवाद्य) आदी कला सादर करणार असून संगीत संयोजन म्हणून विरेश वळंजू काम पहाणार आहेत. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9404598193 यावर संपर्क साधावा. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा