वेंगुर्ले नगर वाचनालय आयोजित पारितोषिक वितरण समारंभ
वेंगुर्ला,दि.२३ जून
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेला विविध देणगीदारांनी देणगी दिल्या आहेत. या देणगीतून प्राथमिक, माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार व पारितोषिक समारंभ रविवार दि. 28 जून रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात आयोजित केला आहे.
बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठी साहित्य समिक्षक डॉ.गोविंद काजरेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात सुदत्त कल्याणनिधी संस्थेने दिलेल्या देणगीतून स्व.सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्काराचेही वितरण होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.