दाभोली नाका येथे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन
वेंगुर्ला,दि.१०ऑक्टोबर
मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका येथे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज सकाळी दुर्गा मातेची नित्य पूजा, आरती तसेच संध्या. 6.30 वा. भजन व महाआरती आणि रात्रौ 7.30 वा. दांडिया नृत्य होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दि. 11 रोजी रात्रौ 8.30 वा. संकल्प क्रिएशन डान्स अॅकडमी कुडाळ प्रस्तुत “नृत्यरंग’, दि. 12 रोजी रात्रौ 8.30 वा. नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट¬ मंडळ मोचेमाड-वेंगुर्ला यांचा महान “येळार ज्योतिर्लिंग स्थापना’ हा दणदणीत नाट¬प्रयोग, दि.13 रोजी रात्रौ 8.30 वा. “तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा’, दि.14 रोजी संध्या. 4 ते 6 हिंदू धर्माभिमानी चैत्र नवमी महिला ग्रुप, वेंगुर्ला प्रस्तुत “महालक्ष्मीष्टक स्तोत्र व अन्नपूर्णा स्तोत्र’ पठण आणि भजन, रात्रौ 8.30 वा. नृत्य कला डान्स अॅकडमी सावंतवाडी प्रस्तुत “नृत्य बहार’, दि.15 रोजी रात्रौ 8.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.16 रोजी रात्रौ 8.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.17 रोजी रात्रौ 8.30 वा. लावण्यसखी ग्रुप मालवण यांचा “महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम, दि.18 रोजी रात्रौ 8.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.19 रोजी सकाळी 9 वा. श्रीसत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दुपारी 12 वा. महाप्रसाद, रात्रौ 8 वा. विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, रात्रौ 8.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि.20 रोजी संध्या.4 वा.महाआरती, संध्या.5 वा. दाभोली नाका -पिराचा दर्गा-श्रीराम मंदिर मार्ग-गाडीअड्डा नाका-बाजारपेठ – जुने बसस्थानक ते मांडवी येथे दुर्गा मातेचे मिरवणूकीने विसर्जन होणार आहे. तरी नागरिकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन मातोश्री कला क्रिडा मंडळाच्यावतीने अध्यक्ष विलास गावडे आणि उपाध्यक्ष सचिन शेटये यांनी केले आहे.