दोडामार्ग तालुक्यात पाणलोट बंधारा कामांमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप

शेअर करा

निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य बांधकाम केल्याचा गंभीर आरोप; निविदा प्रक्रिया न राबवल्याने चौकशीची मागणी**

दोडामार्ग, दि. २१ मे प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जवळपास ९८ कोटी रुपये खर्च करून विविध तालुक्यातील गावात पाणलोट अंतर्गत पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधकाम करणे तसेच काही शेतकरी याना कृषी अवजारे साहित्य पुरवणे यासाठी प्रत्येक गावात पाणलोट अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली. अनेक गावात बंधारा बांधकाम हाती घेण्यात आले. पण दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात बांधकाम केलेल्या असंख्य बंधारे बांधकाम निकृष्ट दर्जाचे तसेच नियमबाह्य पध्दतीने केले आहे. दिलेल्या अंदाज पञक नुसार काम नाही शिवाय बंधारा बांधकाम बाबत निविदा प्रसिद्ध न करता हा घोट झाला आहे. दोडामार्ग मध्ये तीन ते चार कोटी बंधारा घोटाळा झाला आहे. तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी संपूर्ण कामाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात पाणलोट अंतर्गत बंधारा बांधकाम करताना सर्व निकष धाब्यावर बसवून बोगस काम करणारे ठेकेदार नेमून बंधारा बांधकाम केले आहे. पंधरा ते वीस लाख रुपये खर्च पण प्रत्यक्ष जाग्यावर दिड दोन लाख देखील खर्च झालेले नाही. बंधारा बांधकाम करताना नाल्यात जवळपास दोनशे मीटर अंतर पाणी साठा उपलब्ध पाहिजे ज्या ठिकाणी बंधारा बांधकाम केले त्या ठिकाणी दिडशे मीटर परिसर स्वच्छ पाहिजे शिवाय रस्ता कडेला वळणावर अशा प्रकारे बंधारा बांधकाम करू नये.

शेअर करा