देवगड : तिसऱ्या श्रावणी सोमवारी कुणकेश्वर तीर्थस्थळी लोटला भाविकांचा जनसागर

शेअर करा

देवगड,दि.३१ ऑगस्ट

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थस्थळी तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांचा जनसागर लोटला.

सोमवारी पहाटे जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक मोहन दहिकर, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, प्रवीण कदम, शासकीय ठेकेदार ए. पी. सावंत,उद्योजक राहुल शेवाळे यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची पहिली पूजा करण्यात आली. सकाळी 6 नंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या दोन्ही बाजूंनी दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी असूनही भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता आले.

पहिल्या श्रावण सोमवारपासूनच कुणकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. तिसऱ्या सोमवारीही पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. दिवसभर नामांकित भजनी बुवांच्या भजनांसह स्थानिक भजनी मंडळाच्या भजनांमुळे भक्तिय वातारवण निर्माण झाले होते. ठाकरे शिवसेना नेते परशुराम उपरकर, तसेच अधिकारीवर्ग व उपस्थित मान्यवरांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला

शेअर करा