Amboli : आंबोलीत तालुका कृषी शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न!

शेअर करा

ऊस उत्पादन व खोडवा नियोजनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन; शेतकऱ्यांनी मांडल्या विविध समस्या!

आंबोली,दि.०२ नोव्हेंबर

वसंतदादा इन्स्टिट्यूट आंबोली येथे आज तालुका कृषी शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विजय पाटील, साखरे साहेब, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांनी भरपूर सहकार्य केले. यावेळी व्हीएसआयचे शिरपूरकर व गवसे गावचे गुरव यांनी ऊस उत्पादन लागवड व खोडव्याचे नियोजन करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. हा कृषी मेळावा घेण्यासाठी वारंवार पंचायत समितीमध्ये पाठपुरावा केला होता. अखेर आज कित्येक वर्षांनी आंबोली आणि गेळे गावातील ऊस उत्पादक शेतकरी एकत्र या मेळाव्यासाठी आले. शेतकऱ्यांच्या वतीने अशोक नार्वेकर आणि मोहन गवस यांनी आपल्या व्यथा, खत खरेदीवेळी होणारी गैरसोय तसेच ऊस तोडणीसाठी लागणारे कामगारांची होणारी गैरसोय तसेच वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान या गोष्टीवर चर्चा केली. यावेळी आंबोली-गेळे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी व तलाठी ढेरे गमरे, शुभम पाटील प्रकाश पाटील इतर मान्यवर उपस्थित होते. हा कृषी मेळावा संपन्न होण्यासाठी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा यांनी पाठपुरावा केला होता.

शेअर करा