Malvan News:वायरी भूतनाथ येथे ५ रोजी रंगभूमी दिन कार्यक्रम

शेअर करा

मालवण,दि.०२ नोव्हेंबर

मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील भूतनाथ नूतन नाट्य समाज मंडळातर्फे श्री. प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी दि. ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वा. नटराज मूर्तीची पूजा करण्यात येणार आहे. तरी सर्व नाट्य प्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा