आंबोली ,दि. १२ जून
आंबोली गुरववाडी येथील सौ. काशिबाई बाबू गुरव (७५) यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गुरव कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील माजी सैनिक बाबू सोनू गुरव यांच्या पत्नी, माजी सैनिक सोनू गुरव, कारिवडे भैरववाडी प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक रविंद्र गुरव. दोडामार्ग येथील राॅयल फोटो स्टुडिओचे मालक मनोहर गुरव, योगशिक्षक एकनाथ गुरव यांच्या मातोश्री तर ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांच्या त्या बहिण होत. त्याच्या पश्चात पती, चार मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.