अवघ्या १० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेल्या संस्थेची १३ वर्षांत ७५० लिटर संकलनापर्यंत मजल!
सावंतवाडी,दि.०४ नोव्हेंबर
इन्सुली सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित इन्सुलीच्या वतीने सन 2025 -26 यावर्षीचा दुग्ध उत्पादक शेतकरी यांना सात टक्के बोनस वाटपाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य तथा दुग्ध उत्पादक शेतकरी सदाशिव राणे व इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ झाट्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते प्रायोगिक वाटप करण्यात आला .
यावेळी अध्यक्ष पेडणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची गेल्या 13 वर्षात होत असलेली वाटचाल याविषयी माहिती दिली .10 जानेवारी 13 रोजी अवघ्या दहा लिटर दूध संकलनावर सुरू केलेली ही संस्था आज साडेसातशे लिटर दूध संकलन करत आहे .दुग्ध उत्पादक शेतकरी यांना सात टक्के बोनस व्यतिरिक्त गोठ्यात उपयोगी पडणारी भेटवस्तू वर्धापनदिनी दिली जाते तसेच गणेश चतुर्थीला शिधावाटप केला . जातो .सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले आहे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि गोकुळ यांच्या माध्यमातून जिल्हा बाहेरी ल .व राज्याबाहेरी दुधाळ जनावरे खरेदी करण्यात येणार आहेत .यावर्षी सन
2026 -27 साली दूध संकलन 1000 लिटर पर्यंत करण्याचा सर्व दुग्ध उत्पादक शेतकरी व संस्था सदस्य यांनी केला आहे .गोकुळच्या माध्यमातून आज गावात नऊ ते दहा लाखापर्यंत महिना काठी शेतकऱ्यांना दुधाचा मोबदला मिळतो .
दुग्ध उत्पादक शेतकरी पंचायत समिती सदस्य झाल्याबद्दल सदाशिव राणे यांचा शाल श्रीफळ देऊन जेस्ट संचालक विलास गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
याप्रसंगी बोलताना राणे यांनी मी या दुग्ध संस्थेचा दुग्ध उत्पादक शेतकरी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे आपल्या संस्थेने दुग्ध व्यवसायातून गावच्या विकासासाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे माझा माझ्या घरात शेतकरी म्हणून झालेला सन्मान फार मोलाचा आहे .
या कार्यक्रमाला संस्था उपाध्यक्ष सहदेव सावंत सचिव संजय सावंत सदस्य सखाराम बागवे, रामचंद्र पालव सौ गीतांजली हळदणकर तसेच दुग्ध उत्पादक शेतकरी रुपेश परब यशवंत शेटकर कृष्णा परब बिरू पाटील भाऊ नाटेकर गौरव हळदणकर रामचंद्र नाईक राजन धुरी आबा देसाई प्रदीप राणे शंकर गावडे सेल्समन सौ प्रगती गावडे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी तर आभार सचिव संजय सावंत यांनी मानले .




