अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व पदसिद्ध सदस्यांची प्रमुख उपस्थिती
मालवण,दि.२१ मे
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणी चे पदाधीकारी सर्व कार्यकारीणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा हा मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल पेट्रोल पंप नजीक कट्टा या ठिकाणी दिनांक 30.05.2026. रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे सर्वाच्या मताने ठरविण्यात आले आहे.