बांदा : कथाकथन स्पर्धेत आर्या गवस, सुविधा धुरी प्रथम

शेअर करा

मडूरा ग्रंथालयात बनुताई पै स्मृतिदिन संपन्न

बांदा,दि. १८ ऑगस्ट
पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या ज्ञानात वाढ होते. वाचन व संस्काराचे बीज जे बनुताईंनी रुजविले होते, त्याचा वसा आजचे विद्यार्थी जोपासत आहेत, असे प्रतिपादन कै. बनुताई पै ग्रंथालय व संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष कृष्णा करमळकर यांनी केले.

मडूरा येथील बनुताई पै ग्रंथालयात बनुताई पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मडुरा हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सायली परब, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीकृष्ण भोगले, ग्रंथपाल मृणाल पंडीत उपस्थित होते.

सावंतवाडी संस्थानचे शिवरामराजे भोसले यांच्या जयंती व कै. बनुताई पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवरामराजेंच्या जीवन व कार्याचा आढावा शिक्षिका सौ. रेश्मा सावंत तर बनुताई पै यांच्या कार्याचा कृष्णा करमळकर व श्रीकृष्ण भोगले यांनी घेतला.

कथाकथन स्पर्धेत दोन्ही गटांमधून एकूण १८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात मोठ्या गटामध्ये प्रथम आर्या राजेश गवस, द्वितीय पियु महेश नाईक, तृतीय संयुक्ता चंद्रकांत पोखरे तर लहान गटामध्ये प्रथम सुविधा विजय धुरी, द्वितीय समिक्षा समीर बुगडे, तृतीय अथर्व संजय नाईक. विजेत्या स्पर्थकांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचेही बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कृष्णा करमळकर आणि गोविंद गावडे यांनी केले. आदर्श बालवाचक म्हणून जान्हवी शेलेॅकर हिला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षक सुरेश सावंत यांनी केले. आभार ग्रंथपाल मृणाल पंडित यांनी व्यक्त केले.

शेअर करा