४७ हजारांचा दारूसाठा जप्त
बांदा,दि.०९ ऑगस्ट
इन्सुली तपासणी नाका येथे बांदा पोलिसांनी कारवाई करत ४७ हजार २५० रुपये किमतीचा दारूसाठा तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ३ लाख ९७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
निलेश कालेकर (रा. बदलापूर, ठाणे) आणि महेश शेकटे (रा. बदलापूर, ठाणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दारूचा साठा वाहतूक करताना चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०५ जी ४०४३ पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम पालकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिताकांत नाईक , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी देसाई तसेच पोलीस कर्मचारी विठ्ठल खरात यांनी केली.