बांदा,दि.०३ ऑगस्ट
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, वक्तृत्व कौशल्य आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने कोंडुरे येथील पारिजात मंगल कार्यालयात कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुकाभरातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.
स्पर्धा पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच कै. विद्याधर शिरसाट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, जनता विद्यालय तळवडेचे प्रसाद आडेलकर, सागर कानजी, अमोल आरोसकर, दांडेली शाळेच्या शिक्षिका शर्मिला पारिपत्ये, साटेली तर्फ सातार्डा शाळेच्या अस्मिता आरोसकर, माजी केंद्रप्रमुख स्मिता नाईक, मळगाव रस्तावाडी शाळेचे दत्तगुरु कांबळी, रुपेश सावंत व अर्जुन मुळीक उपस्थित होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रभावी कथाकथन सादर केले. पहिल्या गटात सार्थक वालावलकर प्रथम, ओवी आडेलकर द्वितीय, कविराज मालवणकर तृतीय, तर श्राव्या जाधव व सानवी शिरोडकर यांना उत्तेजनार्थ आणि रुची बर्डे हिला विशेष पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या गटात वीरा वाईरकर प्रथम, यश सावंत द्वितीय, वैदेही कामत तृतीय, तर यशश्री आरोलकर व साजो मुळीक यांना उत्तेजनार्थ आणि गायत्री शेणई हिला विशेष पारितोषिक मिळाले.
गेली १४ वर्षे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात असून अनिरुद्ध शिरसाट यांनी पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे पुरस्कृत केली. स्मिता नाईक व दत्तगुरु कांबळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रस्तावना पुरुषोत्तम शेणई यांनी, तर आभार अमोल आरोसकर यांनी मानले. स्पर्धेनंतर सर्व विद्यार्थी व पालकांसाठी आयोजकांतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली.