सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे अध्यक्ष भाजपात

शेअर करा

ॲड. तेजस परब यांनीही समर्थकांसह हाती घेतला भाजपचा झेंडा;पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

सावंतवाडी,दि.०४ सप्टेंबर

उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे अध्यक्ष नरसू रेडकर यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. आरोग्यप्रश्नी लढा देणाऱ्या या संघटनेच्या अध्यक्षांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. मंत्री श्री. राणेंच्या माध्यमातून आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी हा प्रवेश केल्याचे सांगितले.

सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे अध्यक्ष एन.बी. रेडकर यांनी जाहीर प्रवेश केला. तर सातत्याने आरोग्यप्रश्न मांडणारे सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजस परब यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. ॲड. परब यांच्या नेतृत्वाखाली कुणाल खोत, नंदकिशोर गावडे, नारायण आकेरकर, अनंत कोदे, दीपक लाखे, क्रिस्टोफर अल्मेडा, व्हिन्सेंट अल्मेडा, झकेरीस अल्मेडा, अनिकेत मळगावकर, गोविंद मळगावकर, रूपेश चिंदरकर, रॉकसन डान्टास, अक्षय तळवडेकर, पार्थ तळवडेकर, प्रतीक भागवत, अनिल ठाकूर, सिद्धार्थ निंबाळकर, ओमकार चव्हाण, ईशान डोंगरे, अनिकेत चराठकर, रजत एकणेकर, आर्यन आमुणेकर, महादेव हवालदार, संजू येडगे, गंगाराम येडगे, मंगेश सावंत, हर्षद कालेलकर, रोहित पोकळे, शाहिद शेख, गणराज नरसू रेडकर, सुनील तुळसकर, एन. बी. रेडकर, नेहा तुळसकर, सिद्धेश परब, अजित राऊळ, रॉयस्टन डीसुझा, ओमकार शिरसाट, अमेय गिरप, अंकित गिरप, अझीम शेख, केतन पार्सेकर, प्रज्वल सावंत, दुर्गेश सावंत, शिवांग धारगळकर, ओमकार आईर आदींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ॲड. तेजस परब म्हणाले, गेली काही वर्षे सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य व रोजगार संदर्भातील प्रश्न सोडविणे हाच आमचा मुख्य हेतू होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सोबत अलिकडेच झालेल्या काही बैठकांमध्ये त्यांचे याबाबतीतील सकारात्मक विचारांमुळे प्रभावीत होऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यापुढे पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे व आरोग्य व्यवस्था सुधारणे हा आमचा मुख्य हेतू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भाजपची विचारसरणी नरेंद्र मोदींचे व्हीजन यामुळे प्रभावित झालेल्या अन्य सहकाऱ्यांनी देखील माझ्यासोबत भाजपात प्रवेश केला आहे.

शेअर करा