Kudal News : गोव्याचे मुख्यमंत्री देवदर्शनासाठी सिंधुदुर्गात; माणगाव येथील दत्तमंदिरास भेट

शेअर करा

कुडाळ येथे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत

कुडाळ,दि.०१ नोव्हेंबर

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी श्री दत्त मंदिर माणगाव येथे जाऊन दत्त महाराज आणि श्री टेंबेस्वामी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रात्री १० वाजता कुडाळ येथील हॉटेल स्पाईस कोकण येथे भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी निलेश तेंडुलकर, चेतन धुरी, भाजप नगरसेवक निलेश परब, भाजप महिला शहर अध्यक्षा मुक्ती परब, वैभव परब हे उपस्थित होते.

शेअर करा