बांदा : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक शरदचंद्र धुंडीराज महाबळ यांचे निधन

शेअर करा

माजी मुख्याध्यापक, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते; शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाला सलाम

बांदा,दि.०३ ऑगस्ट

बांदा खेमराज मेमोरियल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव शरदचंद्र धुंडीराज महाबळ (वय ७८, रा. गाळेल) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते होते. अयोध्येतील राम मंदिर साठी सन १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर ‘राम शिला पूजन’ आणि वीट (शिला) गोळा करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. यात त्यांचा सहभाग होता. त्यांनी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या बांदा, भेडशी, कुडासे, कोलझर, डेगवे, मडुरा येथील शाळांमध्ये अध्यापनाचे काम केले. ते इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत असतात डेगवे आणि बांदा हायस्कूलमध्ये त्यांनी मुख्याध्यापकाचे काम केले होते. कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही एन नाबर प्रशाळेचे व्यवस्थापन त्यांनी सांभाळले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गाळेल येथील अभियंता जयंत महाबळ यांचे ते वडील होत.

शेअर करा