आचरा,दि. १६ ऑगस्ट(अर्जुन बापर्डेकर)
स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. शाळा *बुधवळे नं. 1 च्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळाचे दमदार सादरीकरण केले. देशभक्ती आणि शौर्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या पसंतीस पडला.
या कार्यक्रमाला बुधवळे गावचे सरपंच श्री. पानवलकर, पोलीस पाटील श्री. कुवळेकर, अमोल चिंदरकर, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य आणि बुधवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हजारें मॅडम आणि सहकारी शिक्षक श्री. तळदेवकर सर यांच्या कल्पनेतून राबविण्यात आला. गेल्या 9 दिवसांपासून आचरा येथील चंद्रकोर मर्दानी खेळ आखाड्याचे प्रशिक्षक वरद जोशी आणि हर्षद पेंडूरकर हे विद्यार्थ्यांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि उत्साही सादरीकरणाचे सर्वांनी कौतुक केले.