देवगड हायस्कूल मध्ये समुपदेशन कार्यक्रम संपन्न

शेअर करा

देवगड,दि.०२ सप्टेंबर

देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूल मध्ये उमा मिलिंद पवार प्रतिष्ठान मुंबई मार्फत आणि शाळेतील सखी सावित्री समिती अंतर्गत इयत्ता आठवी ते नववी मधील मुलींसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर उमा मिलिंद पवार प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सदानंद पवार, माजी मुख्याध्यापक श्री. संजीव राऊत, मुख्याध्यापक श्री. प्रविण खडपकर आदि उपस्थित होते.
“एक स्त्री पूर्ण साम्राज्य उभारू शकते ,एक चांगल्या समाज घडवू शकते” असे प्रतिपादन शर्मिला केळुसकर यांनी केले. सोशल मीडियाचा अतिवापर, पालकांसोबत होणारे कमी संभाषण यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या देखील त्यांनी कथन केल्या. प्रत्येक मुलीला घरी आईकडून अथवा घरच्या व्यक्तींकडून आपल्या आरोग्याबाबत तसेच शरीरामध्ये होणाऱ्या विविध बदलांबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी कथन केले.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनी कडून काही कृती करून घेण्यात आल्या तसेच त्या कृतींचे स्पष्टीकरण देखील विद्यार्थिनींना देण्यात आले. शर्मिला केळुसकर यांनी प्रोजेक्टर द्वारे मुलींचे उत्तमरीत्या समुपदेशन केले. सर्व उपस्थित मुलींचा देखील या समुपदेशन कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे निवेदन व आभार सहाय्यक शिक्षिका श्रीम. स्वरा कोयंडे यांनी केले.

शेअर करा