महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार पर्यटन केंद्राचा विकास
देवगड दि.०४ जुलै
.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने देवगड शहरातील शासकीय जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय जिल्हाधिकारी तुप्ती धोडीमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेडेकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
देवगड शहरात उभारण्यात येणाऱ्या या पर्यटन केंद्रामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि परिसराच्या विकासाला मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.