देवगडमध्ये १५ ऑगस्टनिमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन

शेअर करा

हनुमान युवक क्रीडा मंडळाचा उपक्रम; शालेय व खुल्या गटातील स्पर्धकांना सहभागाची संधी


देवगड,दि.०९ ऑगस्ट

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा देवगड तालुक्यापुरती मर्यादित असून शालेय तसेच खुल्या गटासाठी घेण्यात येणार आहे.

खुल्या गटासाठी प्रवेश शुल्क १०० रुपये असून प्रथम क्रमांकासाठी १ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 751 रुपये, तर उत्तेजनार्थ 351 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच शालेय गटासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून प्रथम क्रमांकासाठी 751 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 551 रुपये आणि उत्तेजनार्थ 351 रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटांमध्ये आकर्षक चषकही देण्यात येणार आहेत.

स्पर्धेची नोंदणी १३ ऑगस्टपर्यंत करता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला कोणत्याही एका गटात सहभागी होता येईल. शालेय गटासाठी स्पर्धकाचे वय १६ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

ही कॅरम स्पर्धा प्राथमिक शिक्षक भवन, कॉलेज रोड, देवगड येथे आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त कॅरमप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन हनुमान युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. विलास रुमडे यांनी केले आहे.

शेअर करा