देवगड : बर्वे लायब्ररीत गोविंद गोडबोले यांचे भावस्पर्शी कथाकथन

शेअर करा

उमाबाई बर्वे लायब्ररी व तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या मुक्तसंवाद उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड ,दि.०१ जुन
येथील उमाबाई बर्वे लायब्ररी व तालुका पेन्शनर्स असोसिएशन देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुक्तसंवाद या कार्यक्रमाचे ३ रे पुष्प मिरज (सांगली) येथील साहित्यिक व माजी आकाशवाणी केंद्र अधिकारी श्री गोविंद गोडबोले यांच्या कथाकथनाने गुंफले. बर्वे लायब्ररीचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर, तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र हिंदळेकर, सचिव श्री विलास करंजेकर, स्नेहसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री चारूदत्त सोमण, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. गणेश (भाई) बांदकर, सचिव सिताराम पाटील, सदस्य दत्तात्रय जोशी व सदस्या सौ. मधुरा कुबल इ. उपस्थित होते.

श्री गोडबोले यांनी कथाकथनात अवाशवाणी केंद्रावर काम करतांना आपल्या सहकाऱ्यांबारोबरच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या. अत्यंत वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या सहकाऱ्यांचे काही दिवसात घट्ट मैत्री होते. नातेसंबंध, करीयर यांचा प्रवास चालू असतांना जीवन, सघर्ष, चिकाटी आणि यश यांची आपल्या क्थेत गुंफण करून जीवनाचा आलेख श्रोत्यांसमोर मांडला. ते बालसाहित्यावर बोलतांना आपण मुलांसाठी अनेक पुस्तकांचे लेखन केले. बालसाहित्य हे लहान मुलांच्या भावविश्वासाचा विकास करणाऱ्या आणि कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या कथा, कविता आणि बाल नाटके इ. मुलांना संस्कार व आनंद देतात. मुलांवर त्यांच्या नक्ळत्या वयातच वाचन संस्कार करायला हवेत. मुलांना काय हवे काय द्यायचे हे पालकांनी ठरवायला हवे. असे ते म्हणाले. त्यांनी बालसाहित्य निर्मितीत मोलाची भर घातली आहे. यावेळी श्रोत्यांशी संवाद साधताना कथाकथन कसे करावे यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष डॉ. परूळेकर यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. गणेश (भाई) बांदकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन सौ. मधुरा कुबल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अभार डॉ. परुळेकर यांनी मानले. यावेळी श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा