प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची फिर्याद; पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई, पोलिसांकडून तपास सुरू
देवगड,दि.१२ ऑगस्ट
वाडातर येथील कांदळवनाची अवैधरित्या तोड केल्याप्रकरणी तेथील विठोबा देऊ जुवाटकर (वय ६१) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडातर येथील संशयित विठोबा जुवाटकर याने तेथील स्वप्नपूर्ती हाऊससमोरील परिसरातील कांदळ झाडांची तसेच पांढरे चिपी कांदळवन प्रजातीच्या झाडांची अवैधरित्या तोड केली. याप्रकरणी कणकवली प्रांताधिकारी जगदीश नारायण कातकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार कांदळवन तोडीप्रकरणी संशयिताविरुद्ध १९८६ चे कलम १५ (१) अन्वये देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.