एकत्रित जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, फ्रेंड्स सर्कल देवगड-सडा, गुजराथी नवरात्र मंडळ व सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांचा पुढाकार
देवगड,दि.२३ ऑक्टोंबर
सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानातून मानवतेची सेवा करण्याच्या उद्देशाने रविवारी, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी देवगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एकत्रित जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या आयोजनात, फ्रेंड्स सर्कल देवगड-सडा, गुजराथी नवरात्र मंडळ देवगड आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राधाकृष्ण रिट्रीट, तारामुंबरी रोड, ब्राह्मणदेव मंदिराजवळ, देवगड येथे पार पडणार आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे आणि मानवतेच्या सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी राजेश तारी (९४२०२६००८०), हर्षल बांदेकर (९८९०१५९९६०) आणि लेहरीकांत पटेल (९४२३३०३८५६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘रक्तदान करा, मानवतेची सेवा करा’ या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.