१३ नमुन्यांपैकी तीन नमुन्यांबाबत अहवाल उपलब्ध असल्याचे संघटनेचे म्हणणे; संबंधित विक्रेत्यांवर कारवाई न झाल्याने काका ढोके यांची नाराजी
देवगड,दि.२३ ऑक्टोंबर
देवगड तालुक्यात कृषी विभागाने जुलै महिन्यात तालुक्यातील 13 औषधविक्रेत्यांकडून कृषी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले हाेते.त्यातील 3 उत्पादनांचे नमूने बाेगस असल्याचे प्रयाेगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर अहवाल प्राप्त हाेणे व दाेष सिध्द झाल्यास नियमानुसार कारवाई करणे ही कृषी विभागाची जबाबदारी हाेती मात्र अहवाल प्राप्त हाेवूनही कृषी विभागाकडून दाेषींवर कारवाई क रण्यात आलेली नाही.बाेगस औषधांमुळे शेतकèयांना माेठ्या नुकसानीला सामाेरे जावे लागणार आहे त्यामुळे या प्रकरणात केवळ विक्रेत्यांचीच नव्हे तर तपासणी व कारवाईसाठी जबाबदार असलेल्या अधिकाèयांचीही चाैकशी व्हावी अशी मागणी आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष काका ढाेके यांनी पत्रकारपरिषदेत केली.शेतकèयांना दिलेल्या तुटपुंजी मदतीतही मलिदा लाटण्याचा प्रकार काही कृषीसेवकांकडून हाेत आहे.त्याचे पुरावे असून संबंधित कृषीसेवकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी कृषी अधिकाèयांकडे केली आहे.तसेच लाचलुचपत खात्याने कारवाई केलेले तलाठी व मंडल अधिकारी पुन्हा याच तालुक्यात सेवेत आहेत.बाहेरच्या जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी प्रचंड संपत्ती सेवेत असताना जमविलेली आहे त्याचीही चाैकशीची मागणी करणार असल्याचे काका ढाेके यांनी सांगीतले.
देवगड येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी आयाेजित पत्रकारपरिषदेत काका ढाेके बाेलत हाेते.यावेळी गणेश गावकर, नीरज घाडी आदी उपस्थित हाेते.काका ढाेके म्हणाले, कृषी विभागाने जुलै महिन्यात कृषी औषध विक्रेत्यांकडील उत्पादनांचे नमूने तपासणीसाठी घेतले हाेते.देवगड तालुक्यात 59 परवानधारक कृषी औषध विक्रेते असून पैकी 53 कृषी औषध विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत.यातील 13 औषध विक्रेत्यांकडून उत्पादनांचे नमूने घेण्यात आले हाेते.त्यातील 3 उत्पादनांचे नमुने बाेगस असल्याचे प्रयाेगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.नमुना तपासणीसाठी पाठविल्यानंतर साधारणत: 30 दिवसांनी अहवाल मिळणे अपेक्षित असते ताेपर्यंत ती औषध विक्री करावयाची नसते मात्र औषध विक्रेत्यांनी नमुने घेतलेली औषधेही विक्री केली असून यामुळे शेतकèयांचे माेठे नुकसान हाेणार आहे.कृषी विभागाने संबंधित औषधविक्रेत्यांवर काेणतीही कारवाई केली नाही.संघटनेने याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता हा विषय न्यायलयीन प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.ही बाब गंभीर असून शेतकèयांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.कृषी अधिकारी व विक्रेते संगनमत करून शेतकèयांना लुटत आहेत व बाेगस औषधे विकणाèयांना पाठीशी घालत आहेत असा गंभीर आराेप काका ढाेके यांनी केला.
येणाèया काळात शेतकèयांना औषधे खरेदी करताना लॅब टेस्टींगसाठी गेले आहे का? याची खात्री शेतकèयांनी करून औषधे खरेदी करावीत.सध्या मिळालेल्या तीन दुकानदारांच्या बाेगस उत्पादनांवर लवकरात लवकर व कायदेशीर कारवाई करण्यासाठी आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघटना पुर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे काका ढाेके यांनी सांगीतले.
संघाची सर्व आंदाेलने ही काेणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत.ही आंदाेलने शेतकèयांचा हितासाठी सुरू आहेत.तरीही काही औषधविक्रेते किंवा त्यांच्याशी काही संबंधित व्यक्ती आंदाेलनाला धमकाविण्याची भाषा वापरत आहेत.जर काेणी आम्हाला धमकविण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी म्हणून आम्हीही रस्त्यावर उतरून त्याचा भाषेत उत्तर देवू.जे बाेगस विक्रेते सत्यतेच्या आड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनाही याेग्य वेळी उत्तर दिले जाईल असा सज् जड इशारा ढाेके यांनी दिला.
गणेश गावकर म्हणाले, शेतकèयांना शासनाकडून नुकसानभरपाईपाेटी मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकèयांचा खात्यावर जमा करताना कृषी सहाय्यक व कृषी सेवकांनी किती मलिदा जमा केला याचे पुरावे संघटनेकडे आहेत. तळेबाजारमधील एका शेतकèयाकडे तेथिल कृषी सेवकांनी किती पैसे मागीतले याचा पुरावा आम्ही तालुका कृषी अधिकाèयांना देवून संबंधित कृषी सेवकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.मृत व्यक्तिचा टाळूवरचे लाेणी खाण्याचा प्रकार कृषी विभागात सुरू आहे.देवगडमधील तलाठी व मंडल अधिकारी शेतकèयांना खरेदी विक्रीच्या, वारस तपासाच्या, शेतकरी दाखल्याचा कामात वारंवार शेतकèयांना त्रास देतात.काही तलाठी व मंडल अधिकाèयांवर यापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झालेली आहे.त्यावेळी त्यांचे तात्पुरते निलंबन झाले हाेते तरीही ते पुन्हा याच तालुक्यात कार्यरत आहेत.बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले तलाठी व मंडल अधिकारी यांनी प्रचंड संपत्ती कमावलेली आहे.जे ग्रामस्थ मुंबईत राहत आहेत किंवा ज्या कुटूंबांना वारसदार नाहीत अशा जमीनी हडप करण्याचे काम काही तलाठी व मंडल अधिकारी करीत आहे.महसुल विभागाने लवकरात लवकर अशा लाेकांवर कारवाई केली नाही तर आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघ शेतकèयांचा न्याय हक्कासाठी माेठे आंदाेलन उभे करेल असा इशारा गावकर यांनी दिला.