शतानिक हिंदळेकर आणि समृद्धी खंडागळे १४ नोव्हेंबरला मुंबईतील चर्चगेट येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार; चित्रकला शिक्षक राजेंद्र कोयंडे यांचे मार्गदर्शन.
देवगड,दि.२४ ऑक्टोंबर
ऊर्जा संरक्षण मंत्रालय भारत सरकार मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी शेठ म ग . हायस्कूल देवगडचा विद्यार्थी शतानिक दर्पण हिंदळेकर इ ७वी तसेच कु .समृद्धी नितीन खंडागळे इ .९ वी यांची निवड झाली आहे . १४ नोव्हेंबर २०२६रोजी ही स्पर्धा चर्चगेट मुंबई येथे होणार असून सदर विद्यार्थी सहभागी होणार आहेत . या दोन्ही विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री राजेंद्र कोयंडे यांचे मार्गदर्शन लाभले.