बुधवारीही तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना.
देवगड,दि.२४ जून
देवगड तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार बुधवारीही सुरू राहिली. या मुसळधार पावसासह होणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे पडझडीचे सत्रही सुरू राहिले.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फणसगाव बौद्धवाडी परिसरात झालेल्या वादळी पावसाने तेथील पंचशील बुद्धविहारावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. या घटनेची पंचयादी महसूल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच श्री स्वामी समर्थ भक्त परिवार, जोगेश्वरी- मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या परिसरातील भिंत पावसाच्या तडाख्याने कोसळून नुकसान झाले आहे. या घटनेत तेथील केळीची छोटी बागही जमीनदोस्त झाली.