देवगड: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संदीप साटम यांनी घेतली सदिच्छा भेट

शेअर करा

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेच्या विधानसभा सह-अध्यक्षपदी निवडीबद्दल मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

देवगड,दि.०४ ऑगस्ट

महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कणकवली दौऱ्यादरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजनेच्या विधानसभा सह-अध्यक्षपदी संदीप साटम यांची झालेल्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

शेअर करा