देवगड : नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रेनकोट व छत्र्यांचे वाटप

शेअर करा

भाजप गटनेते शरद ठुकरूल यांच्या पुढाकारातून भटवाडी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम.

देवगड,दि.२४ जून

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत भाजप गटनेते शरद ठुकरूलं यांच्या वतीने देवगड-जामसंडे भटवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य , रेनकोट व छत्रांच वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भूजबळ,देवगड मंडळ सरचिटणीस योगेश चांदोस्कर ,महिला मंडळ अध्यक्षा उषकला केळुसकर, शहराध्यक्ष वैभव करगुंटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर,शक्ती केंद्र प्रमुख सुभाष धुरी, राजेंद्र वालकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, संजय तारकर,बूथ अध्यक्ष रविंद्र चिंदरकर, नरेश डांबरी, ललित चांदोस्कर, शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा