जामसंडे येथील विद्यार्थ्यांनी २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला
देवगड,दि.०४ ऑगस्ट
जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यामध्ये कु. मनोमय मृत्युंजय मुणगेकर (६८.०%), कु. अनुज मंगेश भोवर (५९.३%), कु. चिन्मयी योगेश भुजबळ (५६.६%), कु. लिशा उमेश आंबेरकर (५४.६%), कु. दुर्वा हेमंत आईर (४४.६%) तसेच कु. श्रावणी संतोष कावले (४४.०%) यांनी यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ, जामसंडे या संस्थेचे अध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे,सचिव -श्री.प्रवीण जोग, शाला समिचे अध्यक्ष श्री.प्रसाद मोंडकर,मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव , सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण अध्यापन व योग्य नियोजन यांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे परिश्रम घेऊन शैक्षणिक क्षेत्रात अधिक मोठे यश संपादन करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !