कळपाची माहिती देऊनही कारवाई न झाल्याचा दावा; नारळ बागेचे नुकसान झाल्याने वनविभागाविरोधात संताप व्यक्त
दोडामार्ग,दि.०७ ऑगस्ट
जंगली हत्ती कळपाकडून होत असलेल्या नुकसान बाबत हत्ती वर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेले वनरक्षक यांच्या बेजबाबदार तसेच दूर्लक्ष पणामुळे नुकसान होत आहे. गुरुवारी रात्री जंगली हत्ती कळप बागेत येत आहे. याची माहिती राञ पाळीवर असलेल्या वनरक्षक याना दिली पण कळपाकडे लक्ष दिले नाही यामुळे हत्ती बागेत शिरूर नारळाच्या झाडांचे नुकसान केले या वनरक्षक जबाबदार आहे असा आरोप हत्ती संकटामुळे हैराण झालेले शेतकरी ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी केला.
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात गुरूवारी रात्री हत्तींच्या कळपाने शेतात धुडगूस घालत माडांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेनंतर वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे हत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असल्याचा गंभीर आरोप ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी केला आहे. ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी सांगितले की, हत्तींच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, वन विभागाकडून वेळेत दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. यापुढे जोपर्यंत सहाय्यक वनसंरक्षक (ACF) स्वतः घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत कोणतेही पंचनामे करू दिले जाणार नाहीत, असा इशारा
तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी दिला आहे. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले नुकसानग्रस्तांना असून, तातडीने भरपाई देऊन हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी हत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
तेवीस वर्षे झाली तरी दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त झाला नाही हे सरकारचे अपयश आहे.