दोडामार्गात खैर तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

रात्रीच्या गस्तीदरम्यान सापळा रचून वाहनांसह संशयित ताब्यात; एक आरोपी फरार, खैर चोरी करणाऱ्या टोळीत खळबळ

दोडामार्ग,दि.०६ ऑगस्ट

दोडामार्ग तसेच गोवा राज्यातून मोठया प्रमाणात खैराच्या झाडाची टस्करी केली जाते यात मोठया प्रमाणात रक्कम मिळते यामुळे दोडामार्ग तसेच गोवा राज्यात खैर चोरी करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. कसर्ई दोडामार्ग वनक्षेत्रात वन विभाग राञी गस्त घालत असताना झाडे कटिंग मशीन आवाज आल्याने वन विभाग यांनी सापळा लावून वाहनांसह काही जणांना ताब्यात घेतले. साडेतीन लाखांहून जास्त मुद्देमाल जप्त केला यातील एक जण फरार झाला. अशी माहिती दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांनी दिली. या कारवाई मुळे खैरे झाडांची चोरी करणाऱ्या टोळीत खळबळ उडाली आहे.

दोडामार्ग वन विभाग यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. दिनांक ५/०८/२६ रोजी मौजे कसई वन सर्वे क्रमांक १७० मध्ये रात्रौ गस्त् करीत असता झाडे कापण्याच्या मशिनचा आवाज आल्याने त्या दिशेने जाऊन बॅटरीच्या दिशेने पाहणी केली असता पहाटे सुमारे साडेचार वा. सुमारास, तीन संशयित आरोपी दिसून आले. त्यातील दोन आरोपी फरार झाले असून आरोपी क्रमांक एक पांडुरंग महादेव गांवकर रा.उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक दोन श्याम नवनाथ तुळसकर रा. नानोडा ता. डिचोली, गोवा यांना पकडण्यात आले. सदर खैर माल नेणेसाठी आणलेले टाटा कंपनीचे डीआय वाहन क्रमांक GA06/T2775 तसेच लाल रंगाची पेंशन प्ल्स क्रमांक GA04/B-5653 व Super Steel इलेक्ट्रीक सायलेंट कटर -1 व जागेवरील खैर मालाची व बुडांची मोजमापे घेऊन बुडावर व जप्त् खैर मालावर जप्ती शिक्का SD-6 उमटवून सर्व मुददेमाल संरक्षणासाठी ताबेत घेतला, खैर नग 38/1.439 घ.मी. माल किमंत 26773/- जप्त वाहने 3 अंदाजे किमंत 300000/- व कटर मशिन अंदाजे किमंत 15000/- जप्त करणेत आला. मोबाईल नग 03 अंदाजे किमंत 30000/- असा एकंदर 371773/- किमंतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 (1), डी, एफ, 41(2) ब अन्वये मणेरी राऊंड गुन्हा क्रमांक सी 07/2026 दिनांक 05.08.2026 अन्वये गुन्हा नोंद केला असून, फरारी आरोपी बाबत आरोपी क्रमांक 1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता आरोपी क्रमांक 3 नितेश नारायण नाईक, रा. उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक 4 किसन शशिकांत गांवकर रा. उसप ता. डिचोली, गोवा यांना दिनांक 06.08.2026 रोजी चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास चालू आहे.

सदरची धाडसी कारवाई ही मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. मिलिश शर्मा साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वैभव बोराटे साहेब सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी, श्री. संभाजी आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग, श्री. तुकाराम सोपान हाक्के वनपाल मणेरी, श्री. शैलेश कांबळे वनरक्षक मणेरी, श्री.शुभम संभाजी वारके वनरक्षक, श्री. विश्राम बाबाजी कुबल वनसेवक मणेरी व जलद बचाव पथक दोडामार्ग मधील श्री. बाबू वरक, श्री. जानू पटकारे, श्री. विलास खरवत यांनी पार पाडली.

शेअर करा