तिलारी धरण व खराडी नदीतील पाणीपातळी वाढली; बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दोडामार्ग,दि.०४ ऑगस्ट
दोडामार्ग तालुक्यात गेले तीन दिवस पढत असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री पासून जोरदार झोडपून काढले तिलारी धरण परिसरात तसेच विजघर भागात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने खराडी नदी पाञात वाढ झाली यामुळे तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्यात पाणी साठा वाढला यामुळे चार दरवाजे काही फुटावर वर उचलून पाणी विसर्ग सुरू केला. तर तिलारी धरणाच्या परिसरात पाऊस झाला यामुळे कोनाळ पुच्छ कालवा मधून चारही दरवाजातून मोठया प्रमाणात पाणी बाहेर पडले यामुळे तिलारी नदीच्या पात्रात वाढ झाली मंगळवारी पहाटे परमे घोटगे गावांना जोडणारा पुल पाण्याखाली गेला यामुळे दोन्ही गावातील संपर्क तुटला. दरम्यान पाऊस जोर वाढला तर पाणी वाढणार आहे. तेव्हा तिलारी नदीच्या काठावरील गावातील नागरीकांनी सतर्क राहावे असे कळवले आहे.
दोडामार्ग तालुक्यात यावर्षी पाऊस थोडा कमी झाला तरी दोन्ही दोडामार्ग तालुक्यातील तिलारी, तेरवण मेढे, शिरवल, धरणात पाणी साठा पूर्ण होऊन पाणी बाहेर पडले आहे. गेल्या वर्षी १० जुलै रोजी तिलारी धरणाचे पाणी बाहेर पडले होते. यावेळी जून, जूलै, पावसाचे प्रमाण कमी होते. आॅगस्ट महिन्यात पाऊस वाढला यामुळे शेती कामाला वेग आला आहे. आवाडा येळपर्ई नदीच्या ठिकाणी पाणी लागले होते. आणखी जोर वाढला तर आवाडा गावात पाणी शिरले असते.

