दोडामार्गला मुसळधार पावसाचा तडाखा; तिलारी नदी धोक्याच्या पातळीवर, घोटगे–परमे संपर्क तुटला

शेअर करा

तिलारी–तेरवण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी दुथडी भरून वाहते; पूल पाण्याखाली गेल्याने दोन गावांचा संपर्क खंडित, जनजीवन विस्कळीत

दोडामार्ग,दि.०४ ऑगस्ट

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिलारी–तेरवण धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने घोटगे–परमे गावांना जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या दोन गावांमधील संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ व पुलाजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या व ओढेही दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शेअर करा