दोडामार्ग: बेकायदा कोळसा वाहतूक बोकाळली; बैल चिरडल्याने संताप

शेअर करा

वेंदात कोक कंपनीसमोर कर्नाटक पासिंग ट्रकखाली शेतकऱ्याचा बैल ठार; ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे अपघात वाढल्याचा आणि संबंधितांवर कारवाईची मागणी.

दोडामार्ग,दि.०५ ऑगस्ट

दोडामार्ग तालुक्यातील वझरे वेंदात कोक कंपनीत गोवा राज्यातून राञीच्या वेळी अवैध ओव्हर लोड कोळसा वाहतूक केली जाते, या कोळसा वाहतूक ट्रक डंपर मुळे अनेक अपघात घडले आहेत. शिवाय रस्ता कडेला असलेल्या घरातील लोकांची वाहतूक मुळे झोपमोड होते अशा प्रकारे अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या कर्नाटक पासिंग ट्रकने वेंदात कोक कंपनीच्या गेट समोर स्थानिक शेतकरी यांच्या बैलाला चिरडून मारल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोळसा वाहतूक मनमानी करणाऱ्यांना वाहतूक अधिकारी पाठीशी घालत आहेत यामुळे कोळसा वाहतूक वाहन धारकांची मुजोरी वाढत चालली आहे.


वझरे वेंदात कोक कंपनीत मोठया प्रमाणात राञी डंपर तसेच बारा चाकी ट्रक मधून अवैध कोळसा वाहतूक केली जाते सर्व कोळसा वाहने ही ओव्हर लोड असतात पण आजपर्यंत दोडामार्ग पोलीस किंवा आर. टी. ओ. कडून कारवाई झालेली नाही. अनेक वाहने याना वाहतूक परवाना महाराष्ट्र नाही तरी कर्नाटक मधील वाहने जास्त प्रमाणात आहेत.

मंगळवारी रात्री गोवा येथून वेंदात कोक कंपनीत कोळसा वाहतूक करणारा ट्रक के. ऐ. ३७-बी.४०८३ ट्रक चालकाने वेंदात कोक कंपनीच्या गेट समोर असलेल्या चार पाच गुरापैकी या ठिकाणी एका बैलावर ट्रक चढवला यामुळे बैल काही अंतर फरफटत गेला जागीच ठार झाला.

शेअर करा