दोडामार्गात गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीची कारवाई..

शेअर करा

6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त

दोडामार्ग,दि.२९ जून

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 6 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सुनील तुकाराम हिंडगावकर (रा. पाटणे फाटा, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(A)(E) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 28 जून 2026 रोजी रात्री 9.45 वाजता करण्यात आली.

कारवाईदरम्यान 1 लाख 68 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू तसेच 5 लाख रुपयांची चारचाकी गाडी असा एकूण 6 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सदानंद राणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल डोमणिक डिसोझा, बस्त्याव डिसोझा आणि जॅक्सन घोणसालविस यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

या प्रकरणाचा पुढील तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.

शेअर करा