अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी; सरपंच अजित देसाई व ग्रामस्थांच्या पुढाकाराने जेसीबीद्वारे अंत्यसंस्कार
दोडामार्ग, दि. १९ जुलै
दोडामार्ग ते बांदा मार्गावर कळणे सडयावर कोणी अज्ञात इसमाने चार चाकी वाहनात भरून मेलेली गाय तसेच काही दिवसांपूर्वी जन्म झालेले मृत वासरू शनिवारी रात्री उशिरा सडयावर आणून टाकल्याने संताप व्यक्त होत आहे. माणूस की हैवान गोमाता तिचे वासरू यांच्यावर खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्याचे सोडून अशा प्रकारे उघडयावर गाय वासरू टाकणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान सरपंच अजित देसाई, ग्रामस्थ जमीन मालक यांनी पुढाकार घेऊन बाजूला असलेले जेसीबी मशीन आणून खड्डा खोदून गाय वासरू याना दफन केले. गोमाता प्रेमी यांनी सरपंच ग्रामस्थ यांचे आभार मानले.
आपण गायीला गोमाता मानतो शासनाने गोमाता राज्य दर्जा दिला आहे. आजही अनेक ठिकाणी गावठी पाळीव जनावरे पाळली जात आहेत. काही विघ्न संतोषी दलाल जनावरे यांची टस्करी देखील करत आहेत.
असे असताना कळणे सडयावर अशा प्रकारे मेलेली गाय वासरू टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कळणे भिकेकोनाळ सरपंच अजित देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गाय वासरू वाहनातून भरून आणून टाकले घटनास्थळी वाहनाचे टायर
लागलेले दिसून आले. एक तर खड्डा खोदून पुरले असते तर काही वाटले नसते. अशा प्रकारे उघडयावर टाकणे यामुळे परिसरात दूर्गधी पसरू शकते. असे सरपंच अजित देसाई यांनी सांगून अशा लोकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.