शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात, लाखोंचे नुकसान तर जीवितहानी टळली
दोडामार्ग ,दि.०७ ऑगस्ट
दोडामार्ग नगरपंचायत कार्यालय नजीक रस्ता कडेला उभी करून ठेवलेल्या ओमीनी कारने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. कार मधून धुर येताच स्थानिक नागरिक यांनी पाणी मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले या नंतर कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत यांच्या अग्निशमन बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवले या आगामी ओमीनी कारचे लाखो रुपये नुकसान झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सदर ओमीनी कार ही रमाकांत राणे कोलगाव सावंतवाडी यांची होती काही कामानिमित्त दोडामार्ग येथे आले असता शाॅटसर्कीट होऊन कारने पेट घेतला. दुपारच्या वेळी द बर्निंग कार थरार बघायला मिळाला.

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कार्यालय नजीक एम. एच. ०७-
ए .बी. २०१५ ही ओमीनी कार उभी करून ठेवली होती. राणे बाजूला गेले होते. दरम्यान दुपारी साडेबारा वाजता ओमीनी कार मध्ये शाॅटसर्कीट होऊन धुर येऊन कारने पेट घेतला. आग भडकली स्थानिक नागरिक यांनी पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले या नंतर बंब आणि एस्टीगुशरणे आगीवर नियंत्रण मिळवले यावेळी मोठया प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.