Dodamarg : दोडामार्गात परतीच्या पावसाची हजेरी; नाचणी-भात शेतीला जीवदान

शेअर करा

दोडामार्ग, दि. ५ आॅक्टोबर
गेल्या चार पाच दिवसापासून उखाडयात वाढ झाली होती. पाऊस पडावा थोडा गारवा निर्माण व्हावा नाचणी भात पिकाला पावसाची गरज निर्माण झाली होती असे असताना सोमवारी दुपारी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात परतीच्या पावसाने हजेरी लावली. विजघर घाटीवडे मेढे मुळस, तसेच साटेली भेडशी भागातील काही गावात ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजघर घाटीवडे या ठिकाणी रस्ता करताना पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग ठेवला नाही यामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी वाहून येऊन तळे निर्माण झाले यामुळे वाहन धारकांची तारांबळ उडाली या पावसाने नाचणी भात शेतीला जीवदान मिळाले आहे.
दोडामार्ग तालुक्यात सकाळ पासून हवामान दमट कोरडे होते दुपारी आकाशात ढग दाटून आले काही ठिकाणी वारे सुटले या नंतर काळोख करून आलेल्या ढगातून प्रंचड गडगडाटासह दाखल झालेल्या परतीच्या पावसाने झोडपून काढले यामुळे विजघर घाटीवडे मेढे भागात जनजीवन विस्कळीत झाले. आंबेली येथे रस्त्यावर ठेकेदार याने माती पसरली यामुळे पडलेल्या पावसाने चिखल झाला काही दुचाकी वाहने घसरून पडली. विजघर घाटीवडे मेढे भागात मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणा मुळे रस्त्यावर पाणी साठून तळे निर्माण झाले यातून मार्ग काढावा लागला. .
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ कडून रस्ता काम सुरू आहे. विजघर घाटीवडे या ठिकाणी काम अपूर्ण आहे. मोऱ्या गटार बंद झाले आहेत ते खुले केले नाही यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वाहन धारकांना पाण्यातून कसरत करत वाहने काढावी लागली.

शेअर करा