दोडामार्ग : तिलारी नदीत शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

शेअर करा

कुडासे वानोशी येथे दुर्दैवी घटना; स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढला

दोडामार्ग, दि. २६ मे

कुडासे वानोशी येथील तिलारी नदी पाञात मंगळवारी आंघोळ करण्यासाठी चार जणांचा ग्रुप आंघोळ करण्यासाठी आले असता मुंबई स्थित शाळकरी विद्यार्थी कु. वेंदात सचिन सांगेलकर, वय वर्षे १३ याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यात मे महिन्यातील ही पहिली घटना आहे. या अगोदर देखील कुडासे वानोशी नदी पाञात आंघोळ करण्यासाठी उतरलेल्या अनेक जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी साडेचार वाजता ही घटना घडली. अखेर स्थानिक ग्रामस्थ यांनी सचिन सांगेलकर याचा मृतदेह बाहेर काढून साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे आणला दोडामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने आईवडील याना धक्का बसला आहे.
मुंबई दादर येथील स्थायिक वेदांत सचिन सांगेलकर हा दोडामार्ग येथे आपल्या आजीकडे उन्हाळी सुट्टी मध्ये राहायला आला होता. तर आईवडील मुंबई येथे असतात वेंदात सचिन सांगेलकर तसेच इतर तिघे असे चार जण आंघोळ करण्यासाठी नदी पाञात उतरले यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने वेंदात सचिन सांगेलकर हा खोल पाण्यात बुडाला. या नंतर आरडाओरडा केला या नंतर ग्रामस्थ धाऊन आले. पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले या नंतर दोडामार्ग पोलिसांना माहिती दिली या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

शेअर करा