दोडामार्ग: सोनावलच्या युवकाचा चंदगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू; गावावर शोककळा

शेअर करा

पोल्ट्री वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर दुचाकीची जोरदार धडक; शुभम डेगवेकर यांचा जागीच मृत्यू, चंदगड पोलिसांकडून पंचनामा

दोडामार्ग,दि.०२ ऑगस्ट

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील युवकाचा चंदगड तालुक्यात भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम डेगवेकर (रा. सोनावल) असे मृत युवकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान वाळकोली फाट्याच्या पुढे असलेल्या वळणावर हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, शुभम डेगवेकर हे दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी पोल्ट्री वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर आदळली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे सोनावल गावासह परिसरात शोककळा पसरली असून, शुभम डेगवेकर यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा