नगरपंचायत आयोजित स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत रोख पारितोषिक व सन्मानचिन्हावर नाव कोरले
दोडामार्ग,दि.०६ ऑगस्ट
नगरपंचायत कसई दोडामार्ग यांच्यामार्फत आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल निर्मिती स्पर्धा दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी नगरपंचायत हॉलमध्ये संपन्न झाली या स्पर्धेमध्ये एकूण पाच मॉडेल्स सहभागी झाले होते त्यापैकी प्रशालेच्या दोन मॉडेल्सनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
कुमारी गिरीजा बाबुराव धुरी, अनुष्का महादेव गवस, सिया सुतार यांनी तयार केलेल्या मॉडेल्सला प्रथम क्रमांक तर गोविंद रवींद्र खडपकर यांने केलेल्या मॉडेलला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना माननीय नगराध्यक्ष चेतनजी चव्हाण, तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर, सचिव श्री व्ही बी नाईक, खजिनदार श्री सी एल नाईक, मुख्याध्यापक श्री संजय पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.
